नांदेड – हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. संतोष तुकाराम डाळके (वय 45) असे मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी (ता.28) पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर किनवट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष डाळके हे पोलिस मुख्यलयात कार्यरत होते. 24 जानेवारीपासून ते आजारी रजेवर होते. 26 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
डाळके यांची कोविड चाचणीही करण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांच्यावर किनवट येथे पोलिस सन्मान अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. संतोष डाळके यांच्या मृत्यूबद्दल पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.