पुणे – शहरात करोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत असून गेल्या पाच आठवड्यांत तब्बल 337 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, सर्वाधिक 224 पुरुषांचा, तर 113 महिलांचा समावेश आहे. मात्र, या मृतांमध्ये पुरूष आणि महिला असे मिळून 243 रुग्णांचे वय हे 60 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुन्हा ज्येष्ठ नागरिकांनाच सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यावर जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण वाढविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
गंभीर आजार असलेले रुग्ण अधिक
महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 337 मृतांमध्ये 136 रुग्णांना वेगवेगळे गंभीर आजार होते. तर 84 जणांचा निव्वळ करोनामुळे मृत्यू झाला आहे. 60 जणांना मल्टिपल ऑर्गन डिस्फन्शन सिंड्रोमचे 60 रुग्ण असून हायपर टेन्शनचे 16, तर इतर आजारांचे उर्वरित रुग्ण आहेत.