नवी दिल्ली – भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू निखत झरीनने 51 किलो वजनी गटाच्या सामन्यात निखतने रशियाची माजी जागतिक विजेती खेळाडू पल्टेसेवा एक्तेरिनाला 5-0 असे पराभूत केले व बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
आता या फेरीत तिची लढत कझाकिस्तानची विश्वविजेती कझायबे नाझिमशी होणार आहे. भारताच्या शिव थापा, सोनिया लादर आणि परवीन यांनीही आपापले सामने जिंकले. आशियाई विजेता शिव थापा, सोनिया लादर आणि परवीन यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शिवने पुरुषांच्या 63 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या सामगुलोव बागटीओव्हला 3-2 असे हरवले.
महिला गटातील दुसऱ्या फेरीत सोनियाने 57 किलो वजनी गटात सुरमेनेली तुगकेनाझचा 5-0 तर, 60 किलो वजनी गटात परवीनने ओजिओल एसेराचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान, दुर्योधन नेगी (69 किलो), ब्रिजेश यादव (81 किलो) आणि किशन शर्मा (91 किलो) यांना पराभवाचा सामना करावा लागला.