मुंबई : उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या स्वतः च्या मुलांना काय संस्कार देणार असे म्हणत रावत नवा वाद निर्माण केला आहे.
Uttarakhand CM :
“Jabh nichey dekha toh gumboot the.. aur upar dekha toh …. NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”CM saab- jabh apko dekha toh upar neeche aagey peechey humein sirf besharm behuda aadmi dikhta hai
State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विवादित विधानावर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नातं नाव्या नंदाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी नाव्या नंदाने शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, आमचे कपडे बदलण्यापेक्षा पहिले तुम्हाला तुमची मानसिक बदलायला हवी. असं म्हणत तिने मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना मानसिकता बदलण्याच्या सल्ला दिला तर मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभेच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरून तीरथ सिंह रावत यांच्यावर हल्लाबोल केला. “उत्तराखंडचे मुख्यमंत्री, एनजीओ चालवतात आणि तुमचे गुडघे फाडलेले दिसतात? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही राज्य चालवता आणि तुमचे मन फाटलेले दिसते?”, असे महुआ मोइत्रा यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.