चेन्नाई – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडीचे जागा वाटप निश्चीत झाले असून या आघाडीत भारतीय जनता पक्षाला 20 जागा देण्यात आल्या आहेत. काल रात्री हे जागा वाटप निश्चीत करण्यात आले.
या करारावर अद्रमुकच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तर भाजपच्यावतीने राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि आणि प्रदेश भाजप अध्यक्ष एल. मुरूगन यांनी स्वाक्षरी केली. अद्रमुकने पीएमके पक्षाशीही आघाडी केली असून त्यांना या राज्यात 23 जागा देण्यात आल्या आहेत. या राज्यात विधानसभेच्या एकूण 234 जागा असून त्यातील 170 जागा अद्रमुक पक्ष लढणार आहे तर बाकीच्या जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत. गेल्या वेळी राज्यात या पक्षाने 134 जागा जिंकल्या होत्या.