मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने आपल्या बहुप्रतीक्षित “दोबारा’ चित्रपटातून प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी कंबर कसली आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहे. तापसीने यापूर्वीही अनेकवेळा अनुराग कश्यपसोबत काम केलेले आहे.
“दोबारा’मध्ये तापसी पुन्हा एकदा पवैल गुलाटीसोबत काम करणार आहे. यापूर्वी समीक्षकांसह चाहत्यांच्या पसंती उतरलेल्या “थप्पड’मध्ये ही जोडी झळकली होती. हा चित्रपट गतवर्षी याच दिवशी रिलीज करण्यात आल्या होता.
या चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रतिभाशली अभिनेत्यासह आपल्या रीयूनियनची घोषणा करत तापसीने सोशल मीडियावर एक सुंदर अशी पोस्ट लिहिल आहे. तापसीने “दोबारा’च्या सेटवरील पवैलसोबतची एक कॅंडिड फोटो शेअर केला आहे.
या फोटोसह तिने लिहिले की, My last of the Dobaaraa Series Coz some collaborations deserve to be repeated. Since this man had some unfinished business in Thappad so this is a chance to mend his mistake pavail gulati Today exactly after ONE YEAR of #Thappad I can only hope he doesn’t lose the woman Dobaaraa P.S- lets see in which parallel universe we were meant to be.
दरम्यान, मागील चित्रपटातील तापसी आणि पवैल यांच्या अभिनयाचे सर्वत्र खूपच कौतुक झाले होते. अशात “दोबारा’मध्ये ही जोडी पुन्हा झळकणार असल्याने चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे.