मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटनाचा सामना करतेय. बिग बॉस 14 मधून सर्व देशाला एंटरटेन करणाऱ्या राखीने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये राखी म्हणते कि, “माझ्या आईसाठी प्रार्थना करा… तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत’ या आशयाची भावनिक पोस्ट तिने शेअर केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा राखी सावंतने आपल्या आईचे दोन फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली.
View this post on Instagram
राखीने शेअर केलेले हे फोटो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटावा. राखीचे चाहतेही हे फोटो पाहून भावूक झालेत. अनेकांनी राखीच्या आईसाठी प्रार्थना देखील केली.