मुंबई – भारत आणि पोलंडमधील पर्यटनास चालना मिळावी म्हणून एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून मराठी अभिनेता मिलिंद जोशी “नो मीन्स नाही’ (पोलिश भाषेत “निई म्हणजे नी’) या इंडो-पोलिश चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे विकास वर्मा जी 7 फिल्म्स पोलंड निर्मित ही एक किशोरवयीन प्रेमकथा असून पोलंडमधील विलक्षण स्थळांवर फिल्म शूट करण्यात आली आहे.
पोलंडमधील इव्हिएक्झिझ्ना प्रदेशातील बिअल्स्को-बियाला, स्झ्झईक आणि झ्वार्डन या भागामध्ये “नो मीन्स नो” चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात शूटिंग करण्यात आले असून आत्तापर्यंत न पाहिले गेलेल्या सौंदर्यचा आनंद भारतीय प्रेक्षकांना घेता येणार आहे. “किक’ या चित्रपटाचे चित्रीकरण वॉर्सा येथे तर “फना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाकोपें येथे करण्यात आले होते. हिवाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य काश्मीरसारखे निसर्गरम्य असते.
या चित्रपटामध्ये भारतीय आणि पोलिश कलाकारा, गुलशन ग्रोव्हर, शरद कपूर, दीप राज राणा, मिलिंद जोशी, कॅट क्रिस्टियन, नाझिया हुसेन (अभिनेता संजय दत्त यांची भाची), ×ना ऍडोर, जर्सी हॅंडझलिक आणि ×ना गुझिक, नतालिया बाक, स्लिव्हिया झेक आणि पावेल झेक यांचा समावेश आहे. “नो मीन्स नो’ हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि पोलिश या तीन भाषांमध्ये एकाचवेळी चित्रित होणारा एक दुर्मिळ चित्रपट आहे.
पोलंड हे मध्य युरोपमधील भारतासाठी प्रवेशद्वार मानले जाते. बायल्सको बियाला, ज्यांना प्रेमाने लिटल व्हिएन्ना म्हणून देखील ओळखले जाते, हे दक्षिण पोलंडमधील एक आकर्षक शहर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून गेल्या शतकातील काही सुंदर प्रतिकृती ज्या जगापासून अल्पित होत्या त्या लोकांसमोर आणणे, या मुख्य उद्देशाने प्रसिद्ध चित्रपट निर्माते विकास वर्मा यांनी ‘नो मीन्स नो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला.
बिएल्स्को बियाला शहर हे विक्टोरियन आर्किटेक्चर आणि अदभूत नैसर्गिक सौंदर्य या दोघांच्या विरोधाभासी संगमामुळे, विकास वर्मा यांचे रोमॅंटिक -ऍक्शन चित्रपट पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण स्थान ठरले. शहराचा ऐतिहासिक प्रभाव तसेच त्याच्या अतुलनीय सौंदर्याबद्दल माहिती होताच वर्मा यांना हे जाणवले की हे शहर त्याच्या दृष्टीने परिपूर्ण वर्तुळात आणण्यासाठी परिपूर्ण आहे. या आश्चर्यकारक जागेवरच विकास वर्मा यांनी आपल्या मोठ्या बजेटच्या ऍक्शन ऍडव्हेंचरचा एक मुख्य भाग शूट करण्याचे निवडले – प्रथम इंडो-पोलिश सह-उत्पादन, ज्यामध्ये विविध वातावरणात ऍक्शन सिक्वेन्सचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे संगीत भारतीय फ्यूजन संगीतासाठी एक अग्रगण्य म्हणून ओळखले जाणारे हरिहरनजी यांनी केले असून संगीत निर्माता त्यांचा मुलगा अक्षय आणि करण हरिहरन (देखील गायक) आहेत. आपल्या सुंदर आवाजाने जगाला मोहून हाकणारी श्रेया घोषाल यांनी देखील या चित्रपटात गायले असून त्यांच्या सोबत रिशव नाग आणि इंडियन आयडॉल चे परीक्षक अरविंदर सिंग यांचा देखील सहभाग आहे.