बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार नववर्षात बोहल्यावर चढले आहे. यात मराठीतील एका क्यूट कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ते कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. याचा विवाहसोळा 24 जानेवारीला पुण्यात थाटामाटात झाला. या दोघांच्या केळवणापासून ते लग्नविधींपर्यंतचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियालवर व्हायरल होत आहे. लग्नानंतर आता हे नवविवाहित जोडपं एकमेकांसोबत घालविण्यासाठी एका सुंदर ठिकाणी गेले आहेत.
चारही बाजूंनी हिरव्या वनराईने वेढलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या लोणावळ्यातील द मचान रिसॉर्टमध्ये सध्या हे दोघे गेले आहेत.
तेथील फोटोज नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्यातील ढेपेवाडा येथे सिद्धार्थ मितालीचा लग्नसोहळा पार पडला. यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
View this post on Instagram
तर सिद्धार्थने रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
View this post on Instagram
दरम्यान, मिताली झी वाहिनीवरील “लाडाची मी लेक गं..’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. तर सिद्धार्थ चांदेकर “सांग तू आहे का..’ या हॉरर थ्रीलर आगामी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.