नवी दिल्ली – दक्षिण-पूर्व दिल्लीतील कालकाजी येथील अंजली ज्वेलर्सच्या शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास एक चोर पीपीई किट घालून शिरला. त्यानंतर चोराने 25 किलो सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला. या दागिन्यांची किंमत 13 कोटी रुपये इतकी होती. दागिन्यांच्या शोरूम जवळील एका इमारतीत चोर शिरला आणि त्यानंतर छतावरुन शोरूमच्या इमारतीत शिरल्याची माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी चोर पाच ते सहा तास उपस्थित होते मात्र, असे असतानाही इमारतीच्या आसपास असलेल्या सुरक्षारक्षकांना याची जरासुद्धा कल्पना आली नाही. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आणि त्याला अटक करण्यात आली.
आरोपी मोहम्मद शेख नूर हा पश्चिम बंगालमधील बुहली जिल्ह्यातील निवासी आहे. तो कालकाजी येथेच इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता आणि तो सध्या सुट्टीवर होता.