पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामाची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार आणि आमदार सुनील टिंगरे यांनी गुरूवारी पाहणी केली.
या वेळी प्रामुख्याने 509 चौक ( बर्माशेल झोपडपट्टीच्या बाजूने जाणारा) ते धानोरी जकातनाका कडे जाणाऱ्या 205 अंतर्गत आखण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी पाहणी करण्यात आली. सदर रस्ता नंदा मालकीच्या जागेतून वायुसेनेच्या संरक्षण भिंतीला लागून जाणारा रस्ता होणे गरजेचे असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी निदर्शनास आणुन दिले. या वेळी ब्रम्हा स्काय सिटी सोसायटीचे चेअरमन डॉ. निजानंद खामकर व सोसायटी मधील इतर सभासदांनी अतिरिक्त आयुक्तंना हा रस्ता त्वरीत चालू करण्यासाठी निवेदन ही दिले.
या शिवाय, धानोरी जकात नाका येथील् पोरवाल रोडला पर्यायही रस्ता म्हणून धानोरी जकातनाका ते डि.वाय. पाटील कॉलेजचा 205 अंतर्गत आखण्यात आलेल्या डि.पी रस्त्यासाठी निविदा निघाली असून त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. धानोरी
स.नं 6 मधील संरक्षण खात्याकडून आवडण्यात आलेला सेवेंत हेवन सोसायटी कडे जाणार्या डि.पी मधील गाव रस्त्याची पाहणी करण्यात आली. तर विमान नगर येथील कोणार्क नगर सोसायटी समोरील देवकर यांच्या मालकीचा रस्ता संदर्भात भूसंपादन अधिकार्यांसोबत चर्चा व पाहणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अनिल टिंगरे, रोड विभागाचे खाते प्रमुख वि.जी. कुलकर्णी व पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.