10 रुपये एक नग इस्त्री : सरासरी 10% धुलाई, ड्रायक्लीन प्रत्येक कपडा वाढ
पुणे – नवीन वर्षात धुलाई आणि ड्रायक्लीनच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक कपड्यांमागे सरासरी 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक नगास इस्त्री करण्यासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. सुमारे चार वर्षांनी ही दरवाढ झाली असून, लॉन्ड्री व्यावसायिक संघाने नुकतेच नवीन दरपत्रक जाहीर केले.
लॉन्ड्री व्यावसायिक संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात असून, अध्यक्षपदी प्रकाश अभ्यंकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाशिककर यांनी ही घोषणा केली. 2020 मध्ये करोनामुळे लॉन्ड्री व्यवसायाचे नुकसान झाले.
तर, अनेकांना व्यवसायदेखील बंद करावे लागले. यासह व्यावसायिकांना जागा भाडे आणि वीजबिल भरणे शक्य नाही.
याच पार्श्वभूमीवर जानेवारी 2016 नंतर पहिल्यांदाच लॉन्ड्रीच्या दरात वाढ केली आहे. याबाबत सरकारकडेदेखील प्रश्न मांडले. परंतु, कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नसल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.