सर्वसाधारणपणे दिवाळी संपत आली की नवे वर्ष सुरु होण्याच्या आधी प्रत्येकाला आगामी वर्षाच्या कॅलेंडर अर्थात दिनदर्शिकेचे वेध लागतात. येणारे वर्ष कसे असेल, आणि कोणते सणवार केव्हा आहेत, कोणत्या सुट्टया कशा असतील याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. दै. प्रभातही वर्ष 2021 पासून एका अभिनव पद्धतीने वाचकांसाठी दिनदर्शिका देणार आहे. मात्र, ही दिनदर्शिका पारंपरिक सहा किंवा 12 पानांची नसेल. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या तारखेला आगामी महिन्याच्या दिनदर्शिकेचे एक पान सर्वच आवृत्त्यांमध्ये एकाच वेळेस प्रसिद्ध केले जाईल. आहे ना अभिनव पद्धत? म्हणजेच आज 31 डिसेंबर 2020 च्या अंकात जानेवारी 2021 चे दिनदर्शिकेचे पान आपल्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जाईल. दै. प्रभातचे वाचक, विक्रेते आणि जाहिरातदार या उपक्रमाचे स्वागत करतील, अशी आशा आहे.
नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह धन्यवाद.
– सरव्यवस्थापक, दै. प्रभात