पिंपरी – शहरामध्ये आज दिवसभरामध्ये 9 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवीन 167 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरामध्ये आजपर्यंत 96483 जणांना करोनाची लागण झाली आहे.
बुधवारी (दि. 30) दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 167 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील सांगवी व चिंचवड येथील दोघांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील चाकण, जुन्नर, अमरावती, देहूरोड विश्रांतवाडी, आळंदी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 198 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 93305 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2133 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
आणखी चार प्रवासी पॉझिटिव्ह
इंग्लंडहून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेल्या 267 प्रवाशांचा शोध प्रशासनाने घेतला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची चाचणी केली आहे. चाचणी केलेल्या प्रवाशांपैकी शनिवारी एक व मंगळवारी एका प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
तर आज पुन्हा आणखी 4 प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडहून शहरामध्ये आलेल्या 267 नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले आहे.