झज्जर – शेतकऱ्यांच्या निदर्शनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबमधील एका वकीलाने निदर्शनांच्या शेजारी आत्महत्या केली. टिकरी सीमेपासून काही अंतरावरच ही घटना घडली.
पंजाबमधील जलालाबाद येथील अमरजितसिंग यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना तातडीने रोहतक येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ते मरण पावल्याचे जाहीर केले.
केंद्र सरकार नागरिकांचा आवाज ऐकणे बंधनकारक व्हावे म्हणून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मी जीव देत आहे, असे त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत लिहले आहे. या चिठ्टीची सत्यता पडताळून पहात आहोत, असे पोलिसांनी सांगितले.