नवी दिल्ली – आर्थिक परिस्थिती सुधारत असली तरी काही मुद्यावरील संदिग्धतामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ चालूच आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे दर ( gold price today ) वाढल्यामुळे दिल्ली सराफातही आज सोन्याचे दर 194 रुपयांनी वाढून 49,455 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीच्या दरातही 1,185 रुपयांची वाढ होऊन ( Silver price today ) चांदीचा दर 66,970 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,874 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.63 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले. धातु बाजारासह विविध बाजाराला बाजारांना फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाची प्रतीक्षा आहे. करोना व्हायरसवर लस उपलब्ध झाल्यामुळे सोन्याच्या दरवाढीला मर्यादा आहेत.
एचडीएफसी सिक्युरीटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, इतर चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारतीय बाजाराही या धातूंचे दर वाढत आहेत.