मेष : सप्ताहात कामांना महत्त्व देऊन ती पूर्ण कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील ती मिळवण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : सुवार्ता कळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल.
मिथुन : एकाच वेळी अनेक कामे मनात येतील. त्यांची आखणी करून वेळ व पैसे यांची सांगड घालून पूर्ण कराल.
कर्क : कामात व्यस्त राहून प्रगती करण्यावर भर राहील. आर्थिक लाभ चांगला असल्याने चिंता नसेल.
सिंह : तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. कामातील प्रगतीचा ध्यास असेल.
कन्या : तडजोडीने तोडगा निघेल. घरात लांबलेली शुभसमारंभ निश्चित होईल. तरुणांना कामाचा हुरूप वाटेल.
तूळ : मानले तर समाधान मिळेल. पैशाचा विनियोग यथायोग्य केलात तर चणचण भासणार नाही.
वृश्चिक : काळानुरूप बदल करून पुढे जाण्याचा तुमचा स्वभाव तुमची प्रगती करण्यास उपयोगी पडतो.
धनु : तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला झळाळी देणारे ग्रहमान लाभत आहे. मनाप्रमाणे जीवन जगण्यात मजा वाटेल.
मकर : तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारे ग्रहमान आहे. घरात खर्चावर बंधन ठेवणे गरजेचे आहे.
कुंभ : तुमचा आशावाद चांगला असल्याने कामात प्रगती कराल. याकामी हितचिंतकाची मदत मिळेल.
मीन : प्रगतीला पूरक ग्रहमान आहे. त्यामुळे काहीतरी चांगले हातून घडावे असे वाटेल.