लखनौ – आपल्या पतीची हत्त्या करुन त्याचा मृतदेह गायब केल्याची तक्रार पोलिसांत दिलेल्या महिलेवर, ज्यांच्या विरोधात तक्रार दिली, त्यांनी घरात घुसून सामूहिक बलात्कार केल्याची दुसरी तक्रार त्या पिडीत महिलेने दिली आहे. ही घटना बस्ती जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबौलिया परिसरात चौघांनी एका घरात घुसून वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 10 डिसेंबर रोजी गावातीलच चार जण घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यांना विरोध केला असता, जीवे मारण्याची धमकी दिली, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे. हे प्रकरण संशयास्पद असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.