मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज शरद पवार यांनी भांडुप येथील संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष @PawarSpeaks यांनी @ShivSena नेते @rautsanjay61 यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मंत्री @dhananjay_munde व आमदार सुनील राऊत उपस्थित होते. pic.twitter.com/T0CzxiO7gQ— Saamana (@SaamanaOnline) December 6, 2020
यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली आहे.