‘दिल जीत’ लिया! शेकऱ्यांसाठी दिलजीतची कोटींच्या घरात मदत

नवी दिल्ली –  केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी  दिल्ली येथे धरणे धरले आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.  दरम्यान, अश्यातच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज सिंधू बॉर्डरवर पोहचला आहे. यावेळी दिलजीतने थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचा मदत निधी दिला.

आंदोलनातील शेतकऱ्यांना ही रक्कम थंडीपासून आराम मिळण्यासाठी स्वेटर किंवा चादर खरेदी करण्यासाठी दिली गेली आहे. पंजाबी गायक सिंघा यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओत शेअर करत दिलजीतने एक कोटी रुपये दान केल्याची माहिती दिली.

तसेच आंदोलनाला पांठिबा दिल्याबद्दलही दिलजीतचे आभारही व्यक्त केले आहेत. सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दिलजीत दोसांजचे जोरदार कौतुक होत आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.