महाळुंगे इंगळे(पुणे)-महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील द्वारका शाळेजवळ चार बंदूकधारी चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
राम बबन लालगुडे (वय 32, रा. भांगेवस्ती द्वारका सिटी महाळुंगे), लखविंदर कर्नल सिंग बजावा (वय 43, रा. द्वारका सिटी), विश्वनाथ दामोदर शिंदे (वय 29, रा. महाळुंगे इंगळे अयी ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. 2) रात्री अडीचच्या सुमारास महाळुंगे इंगळे पोलीस चौकीतील पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना काही संशयित आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तसेच पोलिसी खाक्या दाखवतात चोरट्यांनी गुन्हा कबूल केला.
रात्री-अपरात्री जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांकडून धमकावून त्यांना लुटण्याच्या प्रयत्नात असताना आढळून आले आहेत. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, एक काठी आढळून आली. पोलिसांनी सर्व गोष्टी ताब्यात घेऊन जप्त केले आहेत. या सर्वांवर महाळुंगे इंगळे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नितेश हनुमंत राठोड यांनी दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण करीत आहेत.