मुंबई – देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, ट्रिपल सीट असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी कलाविश्वाला देणारे अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे.
View this post on Instagram
प्रवीण तरडे आपल्या चित्रपटातून नेहमीच समाजातील वास्तविक घटनांना रुपेरी पडद्यावर जिवंत करतात. दरम्यान, आता तरडे एक अस्सल प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. “कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल” असं या आगामी चित्रपटाचं नाव असणार आहे.
View this post on Instagram
प्रवीण तरडे सध्या ‘सर सेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. प्रवीण तरडेने आपल्या चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितलं, “मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. परंतु ही प्रेमकथा एखाद्या सामान्य प्रेमकथेसारखी नाही. तर शेतकऱ्यांशी जोडलेल्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारी आहे.
View this post on Instagram