नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या 93 व्या वाढदिवसानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात मोदींनी म्हटले आहे की, लालकृष्ण आडवाणी यांनी देशाच्या विकासात आणि पक्षाच्या विस्तारात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी पक्ष जनमानसात पोहचवला असेही मोदींनी म्हटले आहे. ते आमच्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत.
देशवासियांसाठी आणि पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांसाठी त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या ट्विटर संदेशानंतर पंतप्रधानांनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा हेही उपस्थित होते त्यांनी आडवाणींना शुभेच्छा दिल्या.