…पुन्हा अनुष्का ‘ट्रोल’

नवी दिल्ली – सध्या अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर बेंगळुरू टीम स्पर्धेतून बाहेर गेल्याने सोशल मीडियावर अनुष्का शर्माला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे.

अनुष्का विराटची पत्नी असल्यामुळे सोशल मीडिया तिच्या मागे हात धुऊन लागला आहे. युजर्सनी विराटच्या अपयशाचे खापर अनुष्कावर फोडले.

विरोट-अनुष्काचे लग्न होण्याअगोदर ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हाही विराटच्या अपयशाचे खापर अनुष्कावरच फोडले जात होते. आताही तोच कित्ता युजर्स गिरवत आहेत. याबाबत अनेक विनोद आणि मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर अनुष्कावर निगेटिव्ह कमेंटचाही पाऊस पडत आहे.

आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीची बेंगळुरू टीमने एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी विराटवर चांगलेच नाराज आहे. मात्र याचा राग ते अनुष्कावर काढत असल्याचे दिसत आहे.

अनुष्काला ट्रोल केल्याबाबत मागे एकदा विराट युजर्सवर चांगलाच भडकला होता. मात्र त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही.

लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनीही मागे विराटच्या अपयशाबद्दल अनुष्कालाच दोष दिला होता. यामुळे चांगलाच वाद उफाळून आला होता. मात्र तरीही ही विचारसरणी बदलली नाही

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.