Corona update | चिंताजनक, पुण्यात आजही बाधितांचा आकडा नऊशे पार

पुणे – शहरात कोरोना संसर्गाचा विळखा पुन्हा घट्ट होण्यास सुरूवात झाली असून, रविवारी  (7 मार्च) नव्याने 984 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 08 हजार 330 इतकी झाली आहे.

तर पुणे महापालिका हद्दीत नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 890 इतकी झाली आहे.

तसेच शहरातील 750 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 96 हजार 751 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 6 हजार 689 रुग्णांपैकी 341 रुग्ण गंभीर तर 682 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.