पिंपरी -करोनाचे मंगळवारी (दि. 5) दिवसभरात 8 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, करोनामुक्त झालेल्या 8 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 2 सक्रिय बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
तर, 70 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. आज दिवसभरात एकूण 1 हजार 122 संशयित रुणांवर चाचणी करण्यात आली. शहरात आत्तापर्यंत एकूण 3 लाख 59 हजार 257 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 55 हजार 292 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.