दुष्काळामुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या – सुप्रिया सुळे

नवी दिल्ली –  राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करून दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाम होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

तसेच, यामुळे जनावरांना चाराही मिळणार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन राज्याला मदतनिधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीहीही सुळे यांनी केली. तसेच, पाण्याच्या समस्येमुळे दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल आहे, अशी माहितीही सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करताना दिली.


दरम्यान, राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करून दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार आता कृत्रिम पाऊस पाडणार आहे. पर्जन्यवाढीसाठी एरियल क्‍लाऊड सीडिंगची उपाययोजना करून मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कृत्रिमरित्या पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी 30 कोटी रूपयांच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.