नवी दिल्ली – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होत आहेत. देशभरात यंदा आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. अश्यातच ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमंलात आली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताच्या राजधानीत म्हणजेच, दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त, शाळा आणि महाविद्यालये वादविवाद, भाषण, निबंध अशा अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करतात. देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो.
का साजरा केला जातो ‘प्रजासत्ताक दिन’?
. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.
26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकाले.