नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असताना आज अचानाक नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 2 लाख 55 हजार 874 नवे रुग्ण आढळून आले असून 614 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 16 टक्क्यांनी घट झाली आहे.
India reports less than 3 lakh COVID cases- 2,55,874 new cases (50,190 less than yesterday), 614 deaths and 2,67,753 recoveries in the last 24 hours
Active case: 22,36,842
Daily positivity rate: 15.52% pic.twitter.com/IW8LijHuru— ANI (@ANI) January 25, 2022
सध्या देशात 22 लाख 36 हजार 842 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 67 हजार 753 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर करोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 70 लाख 71 हजार 898 झाली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15.52 टक्के आहे.