नवी दिल्ली – भारताचे माजी सलामीवीर आणि भाजप नेते गौतम गंभीर यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. गंभीरने ट्विट करून ही माहिती दिली आहे. करोनाचे निधान झाल्यानंतर गंभीर विलगीकरणात गेला आहे. याशिवाय संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
After experiencing mild symptoms, I tested positive for COVID today. Requesting everyone who came into my contact to get themselves tested. #StaySafe
— Gautam Gambhir (@GautamGambhir) January 25, 2022
गौतम गंभीरने लिहिले ‘सौम्य लक्षणांनंतर मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा.असे ट्वीट गंभीरने केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंभीर घरीच करोना उपचार घेत आहे.