मंचर -येथील पिंपळगाव फाट्यानजिक जगदीश मूलाराम सोळंकी यांच्या मालकीच्या भैरव ट्रेडर्स येथे मंचर पोलीस व अन्न व औषध प्रशासन (पुणे) यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत 69 हजार 826 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी जगदीश सोळंकी यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे.
मंचर शहरात सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड पेट्रोलिंग करत असताना मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथे भैरव ट्रेडर्स येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड व इतर कर्मचारी यांनी तपासणी केली केली.
त्याठिकाणी विमल पान मसाला 97, 139 वि तंबाखू 199, वि1 तंबाखू 199 , आरएमडी पान मसाला 17, एम सुगंधित तंबाखू 55, हिरा पान मसाला 59, रॉयल 717 तंबाखू 111 पॅकेट असा एकूण साठा 69 हजार 826 रुपयाचा गुटखा मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला.