लखनौमध्ये कालव्यात वाहन कोसळून 7 बालकांचा मृत्यू

22 जणांना वाचविण्यात आले यश

लखनौ- उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये एका लग्नसमारंभातून परतताना कालव्यात वाहन कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलींचा समावेश आहे. यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य बालकांचा शोध सुरू आहे. या वाहनातून एकूण 29 जण प्रवास करत होते. यातील 22 जणांना वाचविण्यात यश आले आहे. हा अपघात गुरूवारी पहाटे 3 च्या सुमारास घडला.

मानसी (4), मनिषा (5), सौरभ (8), सचिन (6), साजन (8), सनी (5) आणि अमन (9) अशी बालकांची नावे आहेत. या घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या गाडीत प्रवास करणारे बाराबंकीतील सराय पांडे गावातील रहिवासी आहेत. हे सर्वजण एका लग्न सोहळा आटपून परतीचा प्रवास करत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट इंद्रा कालव्यात कोसळले.

Leave A Reply

Your email address will not be published.