सातारा – सोनगाव तर्फ सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 67 लाख 51 हजार 910 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमनसह 16 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिपती एकनाथ नावडकर, शरद नारायण रोकडे.
अंकुश संपतराव जाधव, हिम्मत महादेव जाधव, शंकर तुकाराम जाधव, केशव रघुनाथ नावडकर, सतीश शंकर नावडकर, अनिल महादेव जाधव, अनिल दयानंद कांबळे, रघुनाथ पांडुरंग जाधव, बाबुराव जयसिंग नावडकर, गुलाब विठोबा जाधव, अशोक वामन नावडकर व महिलांचा संशयितांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक शैलेश जनार्दन जाधव यांनी तक्रार नोंदवली आहे.
हा प्रकार 2020 ते 2022 या कालावधीत घडला. संशयितांनी संगनमत करुन लेखापरीक्षण फी, सेव्हिंग्ज खात्यांमध्ये
पोकळ जमाखर्च करणे, ठेवतारण कर्ज व व्याज रोखीने जमा झाल्याचे दाखवून आणि ठेवी व त्यावरील व्याज रोखीने अदा केल्याचे दाखवून अपहार केला आहे. ठेवींच्या मुदती पूर्ण होऊनही ठेवीदार यांना संपूर्ण रकमा दिल्या नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरुन संशयितांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.