मध्यपूर्व संरक्षण करारासंबंधी भारताची अलिप्त भूमिका
नवी दिल्ली, ता. 19 : “”संकल्पित मध्यपूर्व लष्करी संरक्षण करारासंबंधी हिंदुस्थान सरकारच्या वतीनें कोणत्याही मध्यपूर्वंतील देशांशीं कधीहीं वाटाघाटी करण्यांत आलेल्या नाहींत. मध्यपूर्व संरक्षण करारासंबंधीची हिंदुस्थान सरकारची भूमिका साऱ्याच मध्यपूर्वेतील राष्ट्रांना सुपरिचित आहें.” अशी माहिती पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीं आज लोकसभेंत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलें.
डोंगराळ मुलखाचा कारभार
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देतांना पं. नेहरू म्हणाले की, आसाम राज्यातील डोंगराळ मुलखांच्या राज्यकारभारांत घटनात्मक बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. या मुलुखचा राज्यकारभार आसामचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या नावानें सध्या आखतात. या कारभाराची अंतिम जबाबदारी मध्यवर्ती सरकारवर आहें. या मुलुखाचा सर्वांगीण विकास आणि पुरोगामी राज्यकारभार यासंबंधी एक योजना सरकार पुढें असून तिचा विचार सुरू आहे. कारण अलीकडे या भागाला अत्यंत महत्त्व आलें आहें.”
इराणचे मुसादिक सरकार उलथून टाकले : महंमद मुसादिक पळून गेले?
तेहरान, ता. 19 : मुसादिकचे सरकारं उलथून टाकून आज पंतप्रधान डॉ. महंमद मुसादिक यांचे उच्चाटन करण्यांत आल्याची तेहरान नभोवाणीवरून घोषणा करण्यांत आली. इराणच्या शहांनी नेमलेल्या जनरल झहेदी यांनी वजिरांची सूत्रे हातीं घेतली असून शहाच्या पाठीराख्यांनी सरकारी इमारती ताब्यांत घेतल्या आहेंत असेंहीं सांगण्यांत आले.
कम्युनिस्टांशिवाय शहाला जनतेचा पाठिंबा?
कम्युनिस्ट हेच तेवढे आपले शत्रू आहेंत. सर्व जनतेचा मला पाठिंबा आहे, असें इराणचे शहांनी रोम येथे पत्रकारांना निवेदन केलें.
मुसादिक पळाले?
मुसादिक सरकार उलथून टाकल्याची वार्ता आज दुपारी नभोवाणीवर वारंवार प्रक्षेपित करण्यांत आली. पंतप्रधान मुसादिक पळून गेल्याचेही सांगण्यात आले. तथापि दुपारी मुसादिकचें पाठीराखे रस्त्यांत गर्दी करून फिरतांना दिसत होते. तुदेह या कम्युनिस्ट पक्षाचे पाठीराख्यांनी स्थितप्रज्ञता पाळली असून “थांबावे-पाहावे-मग बोलावे’ अशी वृत्ती धारण केली आहें. कालच्या सरकारी घोषणेनें आपल्यावर गदा येणार असें त्यांना वाटत आहें.