पॅराग्वे –रुमानियाची अव्वल मानांकित टेनिसपटू सिमोन हालेप हिने कारकिर्दीतील 21 वे डब्ल्यूटीए विजेतेपद साकार करताना पॅराग्वे ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. अंतिम लढतीत तिने एलिस मार्टीनवर 6-2 व 7-5 असा सहज विजय मिळवला.
करोनाचा धोका सुरू होण्यापूर्वी तिने फेब्रुवारीमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर करोनाचा धोका वाढल्याने सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. आता गेल्या महिन्यापासून युरोपमधील तसेच जगातील अन्य खंडातील हा धोका कमी झाल्याने विविध स्पर्धा सुरू झाल्या. ही स्पर्धा दखील सुरू झाल्यानंतर हालेपने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राखताना महिला एकेरीचे विजेतेपद साकार केले. करोनामुळे मानाची विम्बल्डन स्पर्धा रद्द झाली. त्यावेळी स्पर्धेची तयारी करत असताना हालेपला दुखापत झाली होती. मात्र, ती दुबई स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त ठरली व विजेतेपदही पटकावले होते. आता अशाही स्पर्धेत विजेतेपद मिळवत तिने वर्षातील दुसरे विजेतेपद नोंदवले.