पुरंदरमध्ये भरभरून मतदान; टक्‍केवारी वाढली

65.91 टक्‍के मतदारांनी बजावला हक्‍क

काळदरी – पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी आज 75 टक्के मतदान झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने मतदार उत्साहाने घराबाहेर पडला. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासातच 20 ते 25 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 पर्यंत अनेक मतदान केंद्रावर 50 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजे पर्यंत 60 टक्के पर्यंत तर त्यानंतर उर्वरित एका तासात तरुणांनी मतदान करून 65.91 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान केले.

सासवड येथील संत नामदेव विद्यालय, पुरंदर हायस्कूल, कन्या प्रशाला, वाघिरे महाविद्यालयातील सखी केंद्र आणि ग्रामीण भागातील पूर्व भागातील वनपुरी, वाघापूर, सोनोरी, गुरोळी, सिंगापूर, राजेवाडी, पारगाव, पश्‍चिम भागातील चांबळी, बोपगाव, भिवरी, कोडीत, नारायणपूर, गराडे आदी भागातील मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला.शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्नी, मुलगा यांच्यासह सहकुटुंब त्यांच्या यादववाडीत मतदानाचा हक्क बजावला.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी पत्नी, माजी नगराध्यक्षा आई आनंदीकाकी जगताप यांच्यासह सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. पुरंदर, भोर, बारामती विभागाचे निवडणूक खर्च निरीक्षक ए.एल. मिश्रा यांनी मतदान केंद्रांवर भेटी देवून परिस्थितीचा आढावा घेतला. माळशिरस येथे 1171 पैकी 916 मतदारांनी मतदान केले असून 78. 22 टक्के मतदान झाले आहे. धालेवाडी येथे 82 टक्के, वारवडी येथे 78. 05 टक्के, पारगाव मेमाणे 2998 पैकी 1903 मतदारांनी मतदान केले आहे. वाघापूर येथे 1879 मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदान 78 टक्के झाले आहे. कोडीत येथे 1861 मतदारांनी मतदान केले असून एकूण 72. 94 टक्के मतदान झाले आहे.

काळदरी येथे 77 टक्के मतदान झाले. नवलेवाडी, राऊत वाडी येथे 80 टक्के मतदान झाले. सोनोरी येथे 2026 पैकी 1568 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 77 टक्के मतदान झाले आहे. या प्रमाणे मतदान झाले आहे. गावांच्या मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे – वनपुरी – 77. 43 टक्के मतदान झाले आहे. खानवडी – 77. 98 टक्के, परिंचे – 66.टक्के. राजेवाडी – 78 टक्के. थापेवाडी – 78 टक्के. तर भिवरी गावात 78. 98 टक्के मतदान झाले आहे. आकडेवारी रात्री उशिरापर्यंत आकडेवारी जमा करण्याचे काम सुरु होते. अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सह निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.