मुंबई – गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात जिओ कंपनीने 5 जी नेटवर्क सुरू केले आहे. त्यामुळे गुजरात हे 100 टक्के 5 जी नेटवर्क मिळणारे पहिले राज्य ठरले आहे. गुजरात ही रिलायन्सची ‘जन्मभूमी’ असल्याने गुजरातला विशेष स्थान आहे त्यामुळे कंपनीने 5 जी सेवा या राज्यात वेगाने सुरू केली आहे असे जिओ कंपनीने म्हटले आहे.
जिओने ‘एज्युकेशन-फॉर-ऑल’ नावाच्या 5जी-संचालित उपक्रमाचाही उल्लेख केला,त्याद्वारे गुजरातमधील 100 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. या शाळांना जिओ कंपनीद्वारे 5 जी कनेक्टीव्हीटी, त्या अनुषंगाने प्रगत सामग्री, आणि सहयोग प्लॅटफॉर्म उभारून दिला जाणार आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश एम अंबानी म्हणाले, “आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की गुजरात हे पहिले राज्य आहे ज्याचे 100 टक्के जिल्हा मुख्यालये आमच्या मजबूत 5 जी नेटवर्कशी जोडले गेले आहे. आम्हाला या तंत्रज्ञानाची खरी शक्ती दाखवायची आहे. अब्जावधी लोकांच्या जीवनावर या नवीन तंत्रज्ञानाने परिणाम होऊ शकतो.