Death Valley : ‘या’ ठिकाणचे दगड आपोआप हलतात,आजपर्यंत गूढ उकलले नाही…

जगात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. त्यापैकी अनेक अतिशय सुंदर आहेत जे लोकांच्या मनाला भुरळ घालतात. तर काही ठिकाणे अतिशय धोकादायक आहेत. लोक या ठिकाणी जायला घाबरतात. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील असेच एक ठिकाण, जे जगातील सर्वात उष्ण मानले जाते, येथील तापमान इतके जास्त आहे की एखाद्याची त्वचा जळू शकते. आज आम्ही तुम्हाला अमेरिकन डेथ व्हॅलीबद्दल सांगत आहोत.
या रहस्यमय ठिकाणी जड दगड शेकडो फूट आपोआप हलतात. हे दगड कसे हलतात? या ठिकाणी याबाबत अनेक संशोधने झाली, मात्र आजतागायत त्याचे गूढ उकललेले नाही. त्यामुळे देश-विदेशातील अनेक पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी येतात. हे ठिकाण नेवाडा राज्याजवळ स्थित आहे, जे कॅलिफोर्नियाच्या आग्नेय भागात 225 किलोमीटर पसरलेले आहे.
आतापर्यंत हे दगड हलताना कोणी पाहिलेले नाही. सरकल्यानंतर हे दगड त्यांच्या मागे एक लांब रेषा सोडतात. रेषांच्या खुणा या दगडांच्या सरकण्याबद्दल माहिती देतात. या जागेला ‘व्हॅली ऑफ डेथ’ असेही म्हणतात.
शास्त्रज्ञांनी दगड सरकण्याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. हे रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांची एक टीम 1972 मध्ये या ठिकाणी गेली होती. त्यांनी सुमारे 7 वर्षे या दगडांवर संशोधन केले. यादरम्यान वैज्ञानिकांनी 317 किलो वजनाच्या दगडावर विशेष संशोधन केले. मात्र, या संशोधनादरम्यान तो दगड त्याच्या जागेवरून अजिबात हलला नाही.
काही वर्षांनी शास्त्रज्ञ पुन्हा एकदा त्या दगडाविषयी जाणून घेण्यासाठी तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना दगड पहिल्या जागेपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सापडले. हे पाहिल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. इतर अनेक शास्त्रज्ञ म्हणतात की हे दगड जोरदार वाऱ्यामुळे हलतात. हे दगड सरकण्यामागच्या कारणाबाबत संशोधक वेगवेगळी मतं मांडतात.
Black Friday 2022 : ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणजे काय ? लोकांची ‘या’ दिवशी खरेदीसाठी जोरदार लगबग कशाला?
काही लोकांचा असा विश्वास आहे की, अलौकिक शक्ती या दगडांना एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवतात. स्पेनमधील कॉम्प्युटेन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, इथल्या मातीत असलेल्या सूक्ष्मजंतूंमुळे असे घडते. सूक्ष्मजंतूंमुळे माती गुळगुळीत होते. त्यामुळे दगड मातीवर सरकतात. मात्र, दगड गूढपणे सरकण्यामागच्या कारणाबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.





