जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०३१ वर
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आणखी १९ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा दिली. त्यामुळे सोमवारी दिवसभरात ५८ पाँझिटिव्ह आले. तर आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या १०३१ झाली आहे.
विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांमध्ये १२ पुरुष व ७ महिलांचा समावेश असून त्यातील ४ प्रवासी, १० निकटसहवासित आणि ५ सारीचे रुग्ण आहेत. या १९ जणांमध्ये जावली तालुक्यातील रामवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय युवक, वय ४२, ४८, ४३ व ५५ वर्षीय महिला, बामणोली तर्फ कुडाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, आखेगणी येथील १६ वर्षीय युवक, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील ८३ वर्षीय वृध्द, व ३१ वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन क्वाँर्टरमधील ३९ वर्षीय पुरुष, जिहे येथील ६८ वर्षीय पुरुष, लिंब येथील ४० वर्षीय २ पुरुष, क्षेत्र माहूली येथील ५० वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील ३५ वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाही येथील ६८ वर्षीय महिला, माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.