यवत -करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी अवलंबली आहे. पोलिसांच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करून रस्त्यांवर दुचाक्या घेऊन फिरत असल्याने यवत पोलिसांनी (दि.8) रोजी 50 दुचाक्या जप्त करीत मोकाट फिरणाऱ्यांना दणका दिला.
दहा दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे. या कारवाईत यवतमध्ये सोळा, केडगावमध्ये अकरा, वरवंडमध्ये तेरा व पाटसमध्ये दहा दुचाकी स्वारांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन या कारवाईत एकूण 50 दुचाक्या जप्त करण्यात आलेले आहेत.
नागरिकांनी औषधे, भाजीपाला, किराणा, खरेदीकरीता पायी चालत जावे. विनाकारण वाहन घेवुन गेल्यास तसे आढळून आल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा भाऊसाहेब पाटील यांनी दिला आहे.