Stock Market Closing : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मिडकॅप समभागांमध्ये पुन्हा घसरण झाली आहे. तथापि, स्मॉल कॅप समभागांच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. बँकिंग, ऑटो आणि एनर्जी समभागात झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 453 अंकांनी घसरून 72,643 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 123 अंकांनी घसरून 22,023 अंकांवर बंद झाला.
बाजार मूल्यात घट –
शेअर बाजारातील विक्रीमुळे बाजार भांडवलात घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप घसरून 378.35 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे जे गेल्या सत्रात 380.11 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजच्या व्यवहारात 3936 समभागांचे व्यवहार झाले ज्यात 1811 समभाग वाढीसह आणि 2010 समभाग तोट्यासह बंद झाले, तर 115 समभागांच्या भावात कोणताही बदल झाला नाही.
आजच्या व्यवहारात बँकिंग, एनर्जी, ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभागात घसरण झाली, तर धातू आणि एफएमसीजी समभागात वाढ झाली. केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसी या सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 6 समभाग वाढीसह आणि 24 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 14 समभाग वधारले आणि 36 समभाग घसरले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात भारती एअरटेल 2.10 टक्के, बजाज फायनान्स 1.89 टक्के, मारुती सुझुकी 0.71 टक्के, बजाज फिनसर्व 0.37 टक्के, इंडसइंड 0.30 टक्यांनी वाढला. तर महिंद्रा 4.75 टक्के, टाटा मोटर्स 2.23 टक्के, एल अॅण्ड टी 1.97 टक्के, एनटीपीसी 1.94 टक्के, एचसीएल 1.91 टक्क्यांनी घसरून बंद झाला.