“मराठी चित्र नगरी’ कोल्हापुरात स्थापणार
मुंबई – राज्यमंत्री डी. पी. रुपवते यांनी विधान परिषदेत असे सांगितले की, कोल्हापूर शहरात “मराठी चित्र नगरी’ स्थापन करण्यासाठी जी योजना तयार करण्यात येत आहे त्यासाठी 106 हेक्टर जमीन राखून ठेवण्यात आली आहे.
चीनमध्येही कुटुंब नियोजन पण बोभाटा नाही!
मुंबई – हिंदी कारखानदार संघाचे अध्यक्ष नवल टाटा यांनी असे सांगितले की, चीन गाजावाजा न करता कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अंमलात आणीत आहे. या कार्यक्रमात उशिरा लग्ने व संतती प्रतिबंधक साधने यांचा भरपूर उपयोग यांचा समावेश आहे. नवल टाटा कुटुंब नियोजन
परिसंवादात पत्रकारांना मुलाखत देत होते.
वैद्यकीय व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करा
कोल्हापूर – येथील रुग्ण संघटनेतर्फे सरकारकडे अशी मागणी करण्यात आली की, वैद्यकीय व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करा व सन्मान्य डॉक्टर सेवा रद्द करा.
पुढील वर्षापासून तामिळनाडू राज्यात संपूर्ण दारूबंदी
मद्रास – तामिळनाडू राज्यात पुढील वर्षापासून संपूर्ण दारूबंदी जारी करण्यात येईल. आज मुख्यमंत्री करुणानिधी यांनी सांगितले की, पुढील वर्षापासून राज्यातील गावठी दारूची सर्व दुकाने बंद करण्यात येतील. गेल्या 1 तारखेपासून राज्यातील ताडीची सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या निर्णयाचे महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे.