श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न यूनोकडे न्या
मद्रास – अण्णा द्रमुक पक्षाचे सरचिटणीस कोबाईचे झियान यांनी केंद्र सरकारला अशी सूचना केली आहे की, श्रीलंकेतील तामिळी लोकांचा प्रश्न कायमचा सोडविण्याचे दृष्टीने पावले उचलावीत. जरूर पडल्यास यूनोमध्ये हा प्रश्न उपस्थित करावा. यूनोत यावर चर्चा झाल्यास हा प्रश्न नक्कीच सुटू शकेल. त्यावेळी श्रीलंका सरकारकडून तामिळ लोकांवर पुन्हा अत्याचार होणार नाही याकडे हमी मागावी. तामिळनाडूतून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीलंकेकडे पाठवावे व तेथील परिस्थितीचा अभ्यास करावा.
युरेनियमवरील निर्यातबंदी रद्द
कॅनबेरा – अणुशक्तीनिर्मितीस लागणाऱ्या इंधनाची युरेनियमची निर्यात करण्यावर ऑस्ट्रेलियन सरकारने गेली 4 वर्षे बंदी घातली होती. ती आता उठविली आहे. यामुळे कोट्यवधी डॉलर किमतीचे युरेनियम आता जपान, युरोप, अमेरिका व आग्नेय आशियातील राष्ट्रे यांचेकडे निर्यात करता येईल. याबाबत ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये घोषणा करताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम फ्रेझर म्हणाले, निर्यात बंदी काढल्यामुळे अणुशास्त्रांचा प्रसार थांबेल, कारण प्लुटोनियम न वापरताही इतर राष्ट्रांना अणुशक्तीनिर्मिती केंद्र उभारता येतील. डार्विन बंदराच्या पूर्वेस 220 किमी अंतर युरेनियमसाठी खाणीत खोदाई सुरू होईल.