राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुका नाभिक सलून असोसिएशनच्या कार्यशाळेस 450 प्रशिक्षणार्थींचा सहभाग घेतला, अशी माहिती खेड तालुका नाभिक सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय खंडागळे यांनी दिली.
राजगुरूनगर येथे खेड तालुका नाभिक सलून असोसिएशन वतीने आयोजित हेअर कट, केमिकल अॅण्ड मेकअप या एकदिवशीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. मेकअप आर्टिस्ट नवनाथ आतकर यांनी हेअर केट आणि मेकअपवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
या वेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, रामदास माठे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंगल चांभारे, उद्योजक बबन होले, खेड तालुका नाभिक सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय खंडागळे, सचिव कृष्णा आतकर, सचिन गायकवाड, बाळासाहेब खंडागळे,
गणपत क्षीरसागर, सचिन देवडे, किसन आंबेकर, विनायक क्षीरसागर, शंकर रायकर, सागर कारेकर, नितीन रायकर, सचिन राऊत, संतोष रसाळ, वसंत राऊत,सोपान कदम,रत्नाकर कोर्हाळे, गोपी गायकवाड, अमोल राऊत, स्वप्नील आतकर, महादेव खंडागळे, दर्शन गायकवाड, संतोष जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर नीलकंठ महाराज गायकवाड यांनी आभार मानले.