“पीएमपी’च्या ताफ्यात येणार 400 सीएनजी बसेस

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ऑक्‍टोबरअखेर 400 सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. त्यातील 65 बसेस वितरकाकडे आलेल्या आहेत. 30 बसेसची आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी पूर्ण झालेली आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्या पीएमपीएमएलच्या ताब्यात मिळणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक बसेस पीएमपीकडून खरेदी करण्यात येत आहेत. 400 सीएनजी बसेसपैकी पिंपरी-चिंचवडसाठी 160 तर, पुण्यासाठी 240 बसेस देण्यात येणार आहेत. त्यातील आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी पूर्ण झालेल्या बस लवकरच पीएमपीच्या ताब्यात येणार आहेत. जून ते ऑक्‍टोबर कालावधीत या बस टप्पानिहाय ताफ्यात दाखल होत आहेत. त्यातील 65 बसेस टाटा मोटर्सच्या डिलरकडे आलेल्या आहेत. पुढील टप्प्यातील 53 बसेसही जुलैअखेर दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.

पीएमपीएमपीएल संचालक मंडळाच्या निर्णयानुसार, निगडी आणि भेकराईनगर (पुणे) हे डेपो पूर्णत: इलेक्‍ट्रिक बस डेपो करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलने यापूर्वी 25 इलेक्‍ट्रिक मिडी बस घेतल्या आहेत. त्यातील 10 बस पिंपरी-चिंचवडसाठी तर, 15 बस पुण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. नव्याने 125 इलेक्‍ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. त्यासाठी आवश्‍यक सबसिडीची रक्कम दोन्ही महापालिकांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवडसाठी 50 तर, पुण्यासाठी 75 इलेक्‍ट्रिक बसेस देण्यात येणार आहे. त्यातील आतापर्यंत 49 बसेस निगडी येथील डेपोत दाखल झाल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.