सोमेश्वरनगर (प्रतिनिधी): 39 दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून 43 जणांच्या मोटारसायकल जप्त करून पोलीस ठाणे हद्दीत लावण्यात आलेल्या आहेत. आजपासून जो कोणी नागरिक मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशी माहिती वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यानचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
तसेच वडगांव अंतर्गत येणाऱ्या विविध गावच्या नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 52 (ब), महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 साथीचे रोग निबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे नितीन सकाटे रा.मुढाळे, राहुल खराडे रा.लाटे, बापू कोळेकर रा.पळशी, अमर साळवे रा. वडगाव, प्रतिम कारंडे रा. वडगाव, प्रदयुम शुक्ला रा. (मूळ बडोरा उत्तर प्रदेश) (सध्या वाघळवाडी), प्रजवलीत अहिवळे रा. निंबुत, विनोद टकले रा.कानाडवाडी, सागर होळकर रा. होळ, अनिल भंडलकर रा.मुरूम, सुनील जाधव, अजित जाधव दोघेही रा. साखरवाडी, सीताराम कदम रा. वीर, आदेश घाडगे, ऋत्विक यादव, विशाल मोरे, विकास शिंदे चौघेही रा.वाघळवाडी या 17 जणांवर काल गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.