नाशिक – नाशिक येथील लढाऊ हवाईदल विमाने प्रशिक्षण केंद्रात लढाऊ हेलिकॉप्टर्स चालवण्याचे प्रशिक्षण 33 पायलटांनी पुर्ण केले असून त्यांना आज त्याबद्दल ऍव्हिएशन विंगचा सन्मान देण्यात आला आहे.
मेजर जनरल ए. के. सूरी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या केंद्रावर झालेल्या एका कार्यक्रमात या प्रशिक्षित पायलटांना हा सन्मान देण्यात आला. या वैमानिकांनी प्रशिक्षण कार्यक्रमात कमालीचे कौशल्य दाखवून विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे. यावेळी कॅप्टन संतोषकुमार सौरपल्ला यांना सिल्व्हर चिता ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सर्वोत्तम नैपुण्य प्राप्त पायलट म्हणून त्यांना ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. कॅप्टन तारीफ सिंग यांना कॅ. एस. के. शर्मा ट्रॉफी देण्यात आली. यावेळी अन्यही विशेष नैपुण्य प्राप्त वैमानिकांना सन्मानीत करण्यात आले.