पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील 3 हजार 159 करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर, विभागात करोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 487 झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण 3 हजार 15 आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे
जिल्ह्यातील 5 हजार 367 करोना बाधितांपैकी 2, 770 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 334 आहे. एकूण 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर आहेत.
सातारा
जिल्ह्यातील 241 पैकी 114 करोना बाधित बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 121 आहे. एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांवर तातडीचे उपचार सुरू आहेत.
सोलापूर
जिल्ह्यातील 548 पैकी 224 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 284 आहे. तर, आतापर्यंत एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सांगली
जिल्ह्यातील आतापर्यंत सापडलेल्या 70 करोनाबाधितांपैकी 38 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 31 असून एकाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
कोल्हापूर
जिल्ह्यातील 228 पैकी 13 करोनाबाधित बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 213 आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.