न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
सीआरपीएफकडे सुरक्षा सोपवताच तीन महिन्यातील घटना
बराकीच्या भिंतीच्या विटा काढून कैदी झाले पसार
चंदिगढ : अमृतसर येथील अतिसुरक्षित गणल्या जाणाऱ्या कारागृहातून तीन आरोपी पळून गेले. याप्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदरसिंग यांनी दिले. त्याच बरोबर या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश त्यांनी कारागृह मंत्र्यांना दिले आहेत.
तीन कैदी रविवारी भल्या पहाटे कारागृहातून पळून गेले. त्यांची ओळख पटली असून गुरूप्रितसिंग, जर्नेलसिंग आणि विशालकुमार अशी त्यांची नावे आहेत. अमृतसर मध्यवर्ती कारागृहासह सर्व कारागृहात केंद्रीय राखीव पोलिस दलाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्यानंतर तीनच महिन्यात ही घटना घडली आहे. फरार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी व्यापक मोहीम राज्यभर राबवण्गयात येत आहे. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फेर आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कारागृह अतिरीक्त महासंचालकांना दिले आहेत.
आरोपी पळून जाण्याची घटना पहाटे तीन वाजून 20 मिनिटांनी उजेडात आली. आपली बराक तोडून हे आरोपी कारागृहाच्या भिंतीवरून उड्या मारून पासार झाल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रणात स्पष्ट झाले आहे. आरोपी पळून गेल्यानंतर साधारणत: दोन तासात ही बाब उघडकीस आली. या घटनेची गंभीर नोंद मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतली. त्यांनी केवळ याच कारागृहाचा नव्हे तर राज्यातील सर्व कारागृहाचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिले. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार कैद्यांनी कारागृह सुरक्षा रक्षकाला कैदी पळाल्याची माहिती दिली होती. मात्र पळालेल्यांत या रक्षकाचा भाऊ असल्याने त्याने त्याकडे दूर्लक्ष केले.
या पळाललेल्या कैद्यांना पळण्यासाठी बाहेरून कोणतीही मदत मिळाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. या सात क्रमांकाच्या बराकीत 61 कैदी होते. या तिघांनी पलायनाचा कट आखला असण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपशील देतान पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता म्हणाले, ता आरोपींनी बाराकीच्या सुमारे दहा विटा काढल्या. त्यांनतर त्यांनी एकमेकांला पकडून त्यांनी पहिली भिंत ओलांडली. ती 16 फूट उंच होती. त्यानंतर त्यांनी लोखंडाच्या हुकचा वापर करत रजईच्या आडोशाने बाहेरची 21 फूट ओलांडली. त्यांनी टॉवर क्रमांक 10 पासून अंतीम भींत ओलांडली.
विशाल कुमार (वय 22) हा पाच एप्रिल 2019 पासून कारागृहात आहे. गुरूप्रितसिंग (वय 34) आणि जर्नेलसिंग (वय25) हे आठ जुलै 2019 पासून कारागृहात आहेत.विशालचा भाऊ याच बराकीत होता. मात्र त्याने न पळून जाणे पसंत केले.