मनीला : कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून, या विषाणूमुळे आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा विदेशातील पहिला बळी फिलिपिन्स देशामध्ये दगावल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तर कोरोना विषाणूची लागण नऊ हजार सहाशे 92 जणांना झाल्याचे समोर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गामुळे आणीबाणी जाहीर केली आहे. आरोग्याच्या सोयी-सुविधा नसलेल्या देशामध्ये कोरोना विषाणूमुळे दहशत निर्माण होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.
या विषाणूचा इतर देशात संसर्ग होऊ नये म्हणून अनेक देशांनी चीनमधील हवाई उड्डाणे थांबवली आहेत. या विषाणूचा परिणाम व्यवसायावर देखील दिसून येत आहे. चीनमधील मॅकडोनाल्ड, स्टारबक्स या कंपन्यांनी आपली शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.